गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचे ‘द इनव्हिजिबल फायर’ पुस्तक प्रकाशित

जुलै 30, 2026 4:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी परिवाराचे सदस्य तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. सौरभ सुभाष पाटील यांनी “The Invisible Fire” हे राग व्यवस्थापन (Anger Management) या विषयावरील प्रेरणादायी पुस्तक लिहिले असून, विविध क्षेत्रातील वाचकांकडून या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

The Invisible Fire

मा. श्री. सुभाषदादा पाटील यांचे सुपुत्र असलेले डॉ. सौरभ पाटील यांनी आधुनिक धकाधकीच्या जीवनात राग, तणाव आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. विशेषतः उद्योगपती, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

राग ही प्रत्येकाच्या आयुष्यातील नैसर्गिक भावना असली तरी तिचे योग्य नियोजन आणि सकारात्मक दिशेने रूपांतर केल्यास वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात यश मिळविणे अधिक सोपे होते. याच विषयावर आधारित अनुभव, संशोधन आणि व्यवहार्य उपायांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

“The Invisible Fire” हे पुस्तक Amazon आणि Flipkart या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, वाचकांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचावे, तसेच पुस्तकाविषयीचा अभिप्राय लेखकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. सौरभ पाटील यांच्या या उल्लेखनीय साहित्यकृतीबद्दल गोदावरी परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी साहित्यिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now