डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

जुलै 30, 2026 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक हिपॅटायटिस दिन २०२६ निमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे २९ जुलै रोजी विद्यार्थ्यांमध्ये हिपॅटायटिसविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Hepatitis Day

या कार्यक्रमासाठी डॉ. तन्मय मेहता, रेसिडेंट, जनरल मेडिसिन विभाग, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांनी हिपॅटायटिसचे विविध प्रकार, संसर्ग होण्याची कारणे, लक्षणे, वेळेवर निदानाचे महत्त्व, लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाय तसेच आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना हिपॅटायटिसविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिपॅटायटिसविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपायांचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सुमारे १३० विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्डिओ व्हॅस्क्युलर रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे आयोजित व्याख्यानास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमित जैस्वाल, डॉ. सचिन तेंडुलकर, डॉ. प्रियंका गुमनानी यांनी विशेष परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now