भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

जुलै 30, 2026 4:00 PM

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त उपक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय व भुसावळ श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १० ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भुसावळ नगरपालिका रुग्णालय येथे विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

health jpg webp

या शिबीराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आरोग्य सभापती मेघा वाणी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शिबीरात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शन यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रूग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी दिक्षा सुरे यांच्याशी 9689680901 या क्रमांकावर संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now