जळगाव जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; क्षयरोगमुक्तीमध्ये पटकावला राज्यात प्रथम क्रमांक!

जुलै 30, 2026 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या ‘क्षयरोगमुक्त भारत अभियानात’ जळगाव जिल्ह्याने राज्यभरात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्षयरोग (टीबी) रुग्णांचा वेळेत शोध, आधुनिक पद्धतीने निदान, नियमित उपचार आणि उपचारांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे जिल्ह्याने क्षयरोग नियंत्रणात मोठे यश मिळवले आहे. या अभियानात ८४.७९ गुणांसह जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

Tuberculosis

राज्यातील विविध जिल्ह्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यात अव्वल तीन जिल्हांमध्ये प्रथम जळगाव (८४.७९ गुण), द्वितीय नंदुरचार (८३.८६ गुण), तृतीय क्रमांक गोदिया (८३.३० गुण) मिळवण आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात हे अभियान वेगाने राबवले जात आहे. त्यानुसार मे २०२६ पर्यंत जिल्ह्यातील एकूण १९४० ग्रामपंचायतींपैको ३५७ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. महणजेच आतापर्यंत ४० टक्क ग्रामपंचायतींनी हे यश मिळवले.

या अभियानांतर्गत आरोग्य कर्मचान्यांकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. यांत घरोघरी जाऊन शोध घेणे, एक्स-रे आणि मॉलिक्युलर चाचण्यांद्वारे अत्यंत वेगाने व अचूक निदान करणे, निदान झालेल्या रुग्णांना लगेचच औषधोपचार सुरू करणे, उपचारादरम्यान रुग्ण नियमित औषधे घेत आहेत की नाही, यावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष लक्ष व देखरेख आदींचा समावेश आहे.

१५ ऑगस्टपर्यंत १०० टक्के टीबीमुक्तीचे ध्येय

जिल्ह्यात आतापर्यंत ४० टक्के ग्रामपंचायती टीबीमुक्त झाल्या असल्या तरी, येत्या १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्हा ২০০ टक्के क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे उर्वरित ६० टक्के ग्रामपंचायतींमधील काम अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now