जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अकाउंट विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना गुरूपोर्णिमेनिमित्त वंदन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर, बांधकाम विभागाचे संजय भिरूड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तसेच गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही डॉ. उल्हास पाटील यांना पुष्पगुच्छ देत गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजीस्ट्रार चेतन चौधरी, डॉ. मुकेश चौधरी यांनी देखील गुरूपोर्णिमेनिमित्त डॉ. उल्हास पाटील यांना वंदन केले








