जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा

जुलै 28, 2026 9:15 AM

१२ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारणार

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक फोटोग्राफी दिन (१९ ऑगस्ट) निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, पत्रकार आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.

photography competition

छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणेचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटनांचे क्षण इतिहासात जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासोबतच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी खालील सात गट निश्चित करण्यात आले आहेत.

पोलिस इन पब्लिक सर्व्हिस
क्राईम
सोशल
ट्रॅफिक
जळगाव हेरिटेज
स्पोर्ट्स
वुमन एम्पॉवरमेंट

स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट २०२६ असून, प्रवेशिका ९७०२२००३१५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवाव्यात. प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे मोठ्या आकारात प्रदर्शन करण्यात येणार आहे.

छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सातही गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुरस्कार वितरण मान्यवर मंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग, सेवाभाव आणि पोलीस-जनता सहकार्याचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now