जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) देशभरात 4029 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

या भरती मोहिमेद्वारे ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिंटेंडेंट आणि केमिकल मेटलर्जिकल असिस्टंट ही पदे भरली जातील. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
1) ज्युनियर इंजिनिअर
2) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
3) केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
पद क्र.2: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
अधिसूचनेनुसार, अर्जदारांचे वय १ जानेवारी, २०२७ रोजी १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार आणि निवड प्रक्रिया?
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सातव्या वेतन आयोगाच्या वेतन स्तर ६ अंतर्गत केली जाईल. निवड झाल्यावर, उमेदवारांना दरमहा ₹३५,४०० इतका सुरुवातीचा मूळ पगार मिळेल. याव्यतिरिक्त, त्यांना रेल्वे नियमांनुसार इतर भत्ते देखील मिळतील. आरआरबी जेई भरती २०२६ साठी उमेदवारांची निवड अनेक टप्प्यांमध्ये केली जाईल. सर्वप्रथम, संगणक-आधारित परीक्षा (CBT-1) घेतली जाईल. यशस्वी उमेदवारांना त्यानंतर CBT-2 द्यावी लागेल. कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल. सर्व टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम नियुक्ती दिली जाईल.











