जळगाव सराफ बाजारात सोने-चांदी दरात पुन्हा वाढ; आता १ तोळ्याचा भाव किती?

जुलै 25, 2026 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२६ । सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दरातील चढ-उताराची मालिका कायम असून, २५ जुलै रोजी जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल ₹५ हजार प्रति किलो वाढ झाली आहे.

gold silver 1 jpg webp

यापूर्वी २४ जुलै रोजी सोन्याच्या दरात सुमारे ₹१,८५० आणि चांदीच्या दरात ₹५०० इतकी घसरण झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी बाजारात तेजी परतल्याने सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.

Goodreturuns ने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात आज सकाळी बाजार सुरू होताच २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ₹६००ची वाढ होऊन तो ₹१,४४,९३० वर पोहोचला. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर ₹५५०ने वाढून ₹१,३२,८५०, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ₹४५०ने वाढून ₹१,०८,७०० प्रति १० ग्रॅम झाला आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी तेजी दिसून आली. प्रति किलो चांदीचा दर ₹५,०००ने वाढून ₹२,४०,००० इतका झाला आहे.

सराफ व्यावसायिकांच्या मते, जागतिक बाजारातील हालचाली, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता कायम आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतही दरात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now