पावसाचा रेल्वे सेवेला ब्रेक! आज जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ तीन गाड्या रद्द

जुलै 25, 2026 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह पश्चिम विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने भुसावळमार्गे धावणाऱ्या तीन महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आज शनिवारी (२५ जुलै) पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

train

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही मार्गांवर झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे रुळांवरील परिस्थिती, सिग्नल व्यवस्था आणि वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आज पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २०९२६ अमरावती–सुरत एक्स्प्रेस – अमरावती येथून पूर्णपणे रद्द.
गाडी क्रमांक ०९०५१ दादर–भुसावळ विशेष – दादर येथून पूर्णपणे रद्द.
गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ–दादर विशेष – भुसावळ येथून पूर्णपणे रद्द.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी संबंधित गाडीची सद्यस्थिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमातून तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवस रेल्वे वाहतुकीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now