धावपळ थांबणार, कामे झटपट होणार! निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲप विकसित

जुलै 24, 2026 5:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे सर्वसमावेशक मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती व विविध सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

maha upalbdhi

‘महा-उपलब्धी’ अॅपमध्ये मासिक निवृत्तीवेतन देयकांचा तपशील (Monthly Payment History) पाहण्याची सुविधा, आयकर प्रमाणपत्र (फॉर्म-१६) डाउनलोड करण्याची सुविधा, ई-पीपीओ (e-PPO) लायब्ररी पाहण्याची सुविधा, जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) कोषागार कार्यालयास सादर करण्याची सुविधा तसेच निवृत्तीवेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय (Pension GR) पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या अॅपमध्ये निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पडताळणी करून किंवा पीपीओ क्रमांकाद्वारे सुरक्षितपणे लॉगिन करता येते.

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून ‘महा-उपलब्धी’ अॅप डाउनलोड करून उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now