सोन्याने पुन्हा घेतली मोठी झेप! जळगावात तोळ्यामागे ₹२,२९० ची वाढ, चांदीही महागली..

जुलै 22, 2026 11:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२६ । भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरातील तेजी कायम असून आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही जळगाव सुवर्णपेठेत दरांनी मोठी उसळी घेतली आहे. परिणामी, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

GS22july

२४ कॅरेट सोन्याचा नवा विक्रमी दर

गुडरिटर्न्स (GoodReturns) या संकेतस्थळावरील माहितीनुसार, जळगाव सराफा बाजारात बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम २२९ रुपयांनी वाढून १४,६५१ रुपये झाला आहे.तर प्रतितोळा (१० ग्रॅम) २४ कॅरेट सोन्याचा भाव २,२९० रुपयांनी वाढून १,४६,५१० रुपये झाला आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत २२,९०० रुपयांच्या वाढीसह १४,६५,१०० रुपये इतकी झाली आहे.

२२ आणि १८ कॅरेट सोन्यातही मोठी वाढ

दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्याही दरात लक्षणीय वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव २,१०० रुपयांनी वाढून १,३४,३०० रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात १,७२० रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा दर १,०९,८८० रुपये झाला आहे. १०० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याची किंमत आता १०,९८,८०० रुपये इतकी झाली आहे.

चांदीनेही मारली मोठी झेप

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली. आज चांदीचा दर प्रति किलो ५,००० रुपयांनी वाढून २,४०,००० रुपये झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांनाही अधिक खर्च करावा लागणार आहे.

दर का वाढत आहेत?

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील चढ-उतार, जागतिक आर्थिक घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आगामी सणासुदीचा हंगाम आणि वाढती मागणी लक्षात घेता, दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now