डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

जुलै 17, 2026 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विभागाचे सह. प्रा. डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर येथून मेडिकल मायक्रोबायोलॉजी विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी पीएच.डी.चा व्हायवा-व्होसे यशस्वीरीत्या पूर्ण करून एम.एस्सी. आणि मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये पीएच.डी. ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली असून, त्यांचे संशोधन डॉ. हर्षदा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

Dr. Prashant Kumar Guddeti

त्यांच्या संशोधनाचा विषय “मध्य भारतातील एका तृतीय-स्तरीय रुग्णालयातील ’अ‍ॅसिनेटोबॅक्टर बॉमॅनी’च्या क्लिनिकल आयसोलेट्समधील कार्बापेनेम प्रतिरोध आणि बायोफिल्म निर्मितीचे फेनोटिपिक व जीनोटिपिक गुणधर्मांकन” असा होता. हे संशोधन संसर्ग नियंत्रण, प्रतिजैविकांचा योग्य वापर आणि रुग्णांच्या उपचारपद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

यासाठी डॉ. मुकेश बन्सल, सहाय्यक प्राध्यापक, मायक्रोबायोलॉजी विभाग, एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले.डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने, प्राध्यापकवर्गाने, सहकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now