जळगाव-भुसावळ मार्गे मुंबईला धावणारी ‘ही’ एक्स्प्रेस ३ ऑगस्टपर्यंत रद्द; प्रवासापूर्वी घ्या जाणून

जुलै 15, 2026 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागांतर्गत येणाऱ्या बरेली यार्ड येथे वॉशिंग लाईनच्या तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे मध्य रेल्वेवरून धावणारी आणि जळगाव तसेच भुसावळ स्थानकांवर थांबा असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – बरेली एक्स्प्रेस दोन्ही दिशेने काही दिवसांसाठी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईसह जळगाव, भुसावळ आणि मध्य रेल्वे मार्गावरील हजारो प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

railway 2 jpg webp

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 14313 लोकमान्य टिळक टर्मिनस–बरेली एक्स्प्रेस ही 20 जुलै ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रद्द राहणार आहे. तसेच गाडी क्रमांक 14314 बरेली–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत बरेली येथून रद्द करण्यात आली आहे.

बरेली यार्डातील वॉशिंग लाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. LTT – बरेली एक्स्प्रेस ही उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः जळगाव आणि भुसावळ परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची ट्रेन आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात ही गाडी तब्बल दोन आठवडे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना आता इतर पर्यायी गाड्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.

या कालावधीत या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रावर गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now