जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) ने विविध विभागांतील 148 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 जुलै 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. Cotton Corporation Bharti 2026

ही पदे भरली जाणार?
या भरतीअंतर्गत असिस्टंट मॅनेजर (ऑफिशियल लँग्वेज) – 1, असिस्टंट मॅनेजर (आयटी) – 1, मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – 8, मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स) – 8, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 50, ज्युनियर असिस्टंट (अकाउंट्स) – 50 आणि ज्युनियर असिस्टंट (जनरल) – 30 अशा एकूण 148 पदांची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता :
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर पदांसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, बीई, एमसीए किंवा एमबीएसह अनुभव आवश्यक आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी MBA (Agri Business Management/Agriculture) किंवा CA/CMA पात्रता आवश्यक आहे. तर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिवसाठी कृषी पदवी (B.Sc Agriculture), ज्युनियर असिस्टंट (अकाउंट्स) साठी B.Com आणि ज्युनियर असिस्टंट (जनरल) साठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. बहुतांश पदांसाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक असून SC/ST/PWD उमेदवारांना नियमानुसार गुणांमध्ये सवलत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा 9 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर पदांसाठी 18 ते 32 वर्षे, तर इतर सर्व पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत लागू राहील.
अर्ज शुल्क :
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देशभरातील विविध कार्यालयांमध्ये केली जाणार आहे. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 1,770 रुपये, तर SC/ST, PwD आणि माजी सैनिकांसाठी 590 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, CCI च्या अधिकृत वेबसाइट www.cotcorp.org.in ला भेट द्या.
होमपेजवरील “भरती” (Recruitment) विभागावर क्लिक करा.
तुमचा वैध ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि प्रवर्गाचा तपशील भरा.
तुमचा पासपोर्ट-आकाराचा फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
अर्ज भरल्यानंतर, सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि अर्ज सादर करा.












