जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिकृत आणि सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत टेक्निशियन ग्रेड-१ (सिग्नल) आणि टेक्निशियन ग्रेड-३ च्या एकूण ६,५५७ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

या मेगा भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज, ३० जून २०२६ पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrbapply.gov.in या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै रात्री ११:५९ पर्यंत आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करायचे आहेत. अर्जामध्ये १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत दुरुस्ती करता येईल.

रिक्त पदांचा तपशील :
1) टेक्निशियन ग्रेड-3 (सिग्नल): 323 पदे
2) टेक्निशियन ग्रेड-3: 6242 पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]
वयोमर्यादा
प्रथम श्रेणी पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आणि तृतीय श्रेणी पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे. वयाची गणना १ जुलै २०२६ रोजीच्या स्थितीनुसार केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पगार:
टेक्निशियन ग्रेड-1 (सिग्नल्स) साठी सुरुवातीचा मूळ पगार ₹29,200 (लेव्हल 5) आहे, तर टेक्निशियन ग्रेड-3 ला ₹19,900 (लेव्हल 2) सुरुवातीचा पगार मिळेल. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल्स हे पद 7 व्या वेतन आयोगाच्या लेव्हल 5 अंतर्गत येते, तर उर्वरित सर्व 24 टेक्निशियन ग्रेड III पदे लेव्हल 2 अंतर्गत येतात.
वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 33 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]












