भुसावळ-दादर ‘खान्देश एक्सप्रेस’ आता आठवड्यातून ६ दिवस धावणार; ‘हे’ दोन नवे थांबे जाहीर

जून 27, 2026 9:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

train

गाडी क्रमांक १९००३/१९००४ दादर-भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस आता आगामी १ ऑगस्टपासून आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने भोईसर आणि डहाणू रोड हे दोन अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत.

असे असेल नवीन वेळापत्रक (१ ऑगस्टपासून):

गाडी क्र. १९००३ (दादर – भुसावळ)
ही रेल्वे दादरहून मध्यरात्री १२:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२३ वाजता जळगावला पोहोचेल. ही गाडी दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल (शुक्रवार वगळून).

गाडी क्र. १९००४ (भुसावळ – दादर)
परतीच्या प्रवासात ही रेल्वे भुसावळहून सायंकाळी ०५:४० वाजता सुटेल. त्यानंतर सायंकाळी ०६:०५ वाजता जळगाव स्थानकावर येईल आणि दादरसाठी रवाना होईल. ही गाडी देखील सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावणार आहे.

फेऱ्यांमध्ये झालेली वाढ आणि नवीन थांब्यांमुळे मुंबई-खान्देश दरम्यान प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now