जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । भुसावळ येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश पोतदार यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली तर्फे समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
केंद्रीय मानवाधिकार या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात नुकताच मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर के.एम.टी.व्हीचे सह संचालक श्रीकांत शहारे व त्यांचे महिला कर्मचारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजु भटकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोतदार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश सैनी जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया, जळगाव जिल्हा महासचिव हकीम आर. चौधरी, रावेर तालुका अध्यक्ष महेंद्र महाजन मुक्ताईनगर, तालुका संघटन सचिव विनोद खराटे, गणेश कोळी यांची विशेष उपस्थिती होती
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश पोतदार मानवाधिकार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते राजेश सैनी यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी डॉ. मिलिंद दहिवले यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रसंगी संजु भटकर यांनी प्रास्ताविकात संघटने विषयी विचार व्यक्त केले. राष्ट्रीय संघटन सचिव डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.
तर डॉक्टर मिलिंद दहिवले यांनी संघटनेच्या मानव अधिकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्रीमती सुवर्णलता अडकमोल यांना खान्देश रणरागिणी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश पोतदार आणि जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया त्यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. संजु भटकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी विवेक सैनी, भूषण आंबोडकर, हर्षल गोराडकर, किशोर बऱ्हाटे सर, ॲड. कल्पना टेमाणी, संतोष यादव आदि उपस्थित होते.