जळगावात महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार; ५७२ खेळाडूंचा सहभाग!

जून 12, 2026 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६’ चे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम पाळधी येथील सुगोकी लॉन्स रिसॉर्ट येथे घेण्यात आला.

​या भव्य क्रीडा सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित सावरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महासचिव डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलन वैद्य, अनिल त्रिवेदी आणि बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पाळधी येथील गोपाल कासट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

​पाच दिवस चालणार थरार!
ही स्पर्धा एकूण पाच दिवस चालणार असून, पाचव्या दिवशी अंतिम फेरीतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर यांनी दिली.

​या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेल्या एकूण ५७२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ११, १३ आणि १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या वयोगटात घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला असून, अनेक अटीतटीचे सामने रंगले. राज्यातील उदयोन्मुख बॉक्सिंग पटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे. क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now