जळगावमार्गे पुण्याला धावणारी ‘ही’ एक्स्प्रेस रद्द; झेलम, अमरावती एक्स्प्रेस पुणेऐवजी ‘या’ स्थानकांपर्यंतच धावेल..

जून 11, 2026 3:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ आणि जळगाव मार्गे पुण्याला प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे मंडळांतर्गत पुणे यार्डात रेल्वे संरचनेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ‘ब्लॉक’ घेतला असल्याने, या मार्गावरील काही गाड्यांच्या वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार असून काही गाड्या पूर्णपणे रद्द, तर काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

train

यामध्ये १२१३५ पुणे – नागपूर एक्स्प्रेस ही गाडी १४ जून, तर १२१३६ नागपूर पुणे एक्प्रेस ही गाडी १३ जून रोजी नागपूर येथून रद्द केली आहे. तर ११०७८ जम्मूतवी – पुणे एक्स्प्रेस ही १२ जून रोजी जम्मूतवी येथून सुटल्यानंतर हडपसर स्थानकापर्यंतच धावेल. हडपसर ते पुणे हा प्रवास रद्द राहील. गाडी क्र. ११४०६ अमरावती – पुणे एक्सप्रेस ही १३ जून रोजी अमरावतीहून सुटल्यानंतर हडपसर येथेच प्रवास समाप्त होईल. हडपसर – पुणे दरम्यानची सेवा रद्द राहणार आहे.

‘राणी कमलापती एक्स्प्रेस’च्या वेळेत बदल

२२१७१ पुणे राणी कमलापती एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही गाडी १४ जून रोजी नियोजित वेळेपेक्षा उशिरा म्हणजे सायंकाळी ७.५५ वाजता पुणे येथून सुटेल. या गाडीची नियोजित सुटण्याची वेळ दुपारी ३.१५ वाजता होती.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, रेल्वे पायाभूत सुविधां आधुनिकीकरण, सुरक्षितता वाढवणे आणि भविष्यातील अधिक सुकर रेल्वे संचालनासाठी हे काम अत्यावश्यक आहे. या कालावधीत प्रवाशांनी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन स्थानिक रेल्वे प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now