जळगाव लाइव्ह न्यूज | २० मे २०२६ | केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री धोरणाचा निषेध करण्यासाठी आज जळगाव शहरातील तब्बल ८०० औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. व्यावसायिक अस्तित्वाच्या या लढ्यात एकीकडे आंदोलनाचे हत्यार उपसले असताना, दुसरीकडे जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनने संवेदनशीलता दाखवली आहे. आंदोलन हक्कासाठी, रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासाठी नाही, अशी भूमिका घेत असोसिएशनने संपाच्या काळातही रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही, याचे नियोजन केले आहे.

संपामुळे औषध पुरवठा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होतील, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली होती. पण, केमिस्ट असोसिएशनने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शहरात आपत्कालीन औषध पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. बंदच्या काळात कोणत्याही रुग्णाला अत्यावश्यक किंवा तातडीच्या औषधांची गरज भासल्यास, केमिस्ट असोसिएशन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन जारी करण्यात आले आहेत.

हा लढा आमच्या अस्तित्वाचा असला तरी रुग्णहित आमच्यासाठी सर्वोपरी आहे. हे आंदोलन मेडिकल व्यवसायिकांच्या अस्तित्वाचा लढा आहे. परंतु, यात रुग्णाची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन कटिबद्ध आहे. संपाच्या काळातही रुग्णहित आमच्यासाठी सर्वोपरी असेल, अशी भुमिका जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी स्पष्ट केली आहे.
नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास ते खालील पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकतात:
समीर गुळवे : ९५६११११००२
विलास बरडे : ९३२६५३४३५३
दीपक चौधरी : ९८६०४२८११०
साहेबाराव भोई : ९६०४९८३५६६
बाळकृष्ण सोनवणे : ९४२३९१५७९५
विनोद चौधरी : ९४०५९१७०९१
किशोर बारी : ९८२३६७१०५८







