जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने नुकत्याच सातारा येथे दिनांक ३ मे ते ७ मे दरम्यान १३ वर्षांखालील मुला-मुलींच्या आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या मुला व मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला. मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत प्री-क्वार्टर फेरीपर्यंत मजल मारली. या संघाला १८ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमार देवेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेळाडू कुमार भाग्येश पाटील याची संभाव्य महाराष्ट्र राज्य मुलांच्या बास्केटबॉल सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. त्याला पाचोरा तालुक्याचे बास्केटबॉल प्रशिक्षक श्री. जावेद शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

त्याच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशन मिलवाणी, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव श्री. जयंत देशमुख, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे कार्यकारणी सदस्य श्री. निलेश पाटील, श्री. जितेंद्र शिंदे, श्री. विकास महाजन, डॉ. प्रकाश पाचपांडे, श्री. विजय बेंडाळे, श्री. हरीश कारडा, श्री. रुपेश जगताप, श्री. मयूर लाहोरी आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त बास्केटबॉल प्रेमींनी कुमार भाग्येश पाटील यांचे अभिनंदन केले.







