कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

मे 8, 2026 6:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ मध्ये जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात फैजपूर येथील जे. टी. महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमधून कृतिका अजय फेगडे हिने ९६.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.

j t mahajan

तिने इंग्रजी विषयात ९७, गणितात ९६, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९८ तर सामाजिक शास्त्र विषयात ९३ गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले. विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.विद्यालयाच्या या उल्लेखनीय निकालामुळे फैजपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व नागरिकांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now