जळगावकरांना उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा नाहीच ! ‘या’ तारखेनंतर मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार, वाचा हवामान अंदाज?

मे 8, 2026 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२६ । सध्या महाराष्ट्रात एकाच वेळी दोन टोकांचे हवामान अनुभवायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वी (६ मे) सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाल्याने जळगावकरांना उन्हाच्या तडाख्यातून तात्पुरता दिलासा दिला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणारा नसल्याचे चित्र आहे.

TP1

हवामान विभागाने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभर तरी जिल्ह्यात कडक ऊन राहील आणि उष्णतेचा तडाखा कायम असेल. मात्र २० मेनंतर जिल्ह्याच्या हवामानात मोठे बदल होऊन मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे

शेजारील विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी जळगाव जिल्ह्यासाठी मात्र ११ मेपर्यंत पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. हवेच्या दिशेत बदल होऊन बाष्पयुक्त ढगांची निर्मिती झाली, तरच किरकोळ पाऊस पडू शकतो, अन्यथा उन्हाचा पारा चढाच राहणार आहे.

बुधवारी जळगावचे तापमान ४१.२ अंशावर होते. दुपारच्या वेळेस सूर्य आग ओकत असून बाहेर पडणं कठीण होत आहे. परंतु मागच्या तीन दिवसात रात्रीच्या तापमानात घट झाली. तीन दिवसापूर्वी २४ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा गुरुवारी २० अंशावर पोहोचला आहे. मात्र उकाडा कायम आहे. हवामान अंदाजानुसार आगामी काही दिवस कमाल तापमान ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहील. रात्रीचे तापमान २३ ते २६ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे

मे महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच २० मेनंतर जिल्ह्याच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहून मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कसे असेल आगामी ५ दिवसांचे तापमान?

८ मे: ४२ अंश सेल्सिअस
९ मे: ४३ अंश सेल्सिअस
१० मे: ४२ अंश सेल्सिअस
११ मे: ४३ अंश सेल्सिअस
१२ मे: ४३ अंश सेल्सिअस

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now