ठाकरे गटाला मोठा धक्का ; तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी धडाधड सामूहिक राजीनामे

मे 6, 2026 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नसून, आता परभणी जिल्ह्यात ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करत परभणीचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची हकालपट्टी केली होती. मात्र, आता या कारवाईचे पक्षात तीव्र पडसाद उमटले असून, आनेराव यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी धडाधड सामूहिक राजीनामे दिले आहेत. या राजकीय भूकंपामुळे परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

udhav thakre jpg webp

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या एका विधानामुळे पक्षातील नेत्यांमध्ये मोठी चलबिचल सुरू झाली होती. संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. दरम्यान, शिवसेना भवन येथे आयोजित एका महत्त्वाच्या बैठकीला जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव हे गैरहजर राहिले. आनेराव हे खासदार संजय जाधव यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि पक्षात शिस्त आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट कारवाई करत आनेराव यांना जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हटवले.

माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने परभणीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. याच नाराजीतून जिल्ह्यातील विविध आघाड्यांच्या, तालुका आणि शहर पातळीवरील ८२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now