जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२६ । उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जळगावमार्गे उधना ते मधुबनी (बिहार) दरम्यान आजपासून ‘अनारक्षित विशेष रेल्वे गाडी’ धावणार आहे. ही रेल्वे सेवा १ मे पासून २६ जूनपर्यंत उपलब्ध राहणार असून, यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

उधना–मधुबनी विशेष गाडी

उधना–मधुबनी विशेष गाडी क्रमांक ०९१५१ ही १ मेपासून २६ जूनपर्यंतच्या कालावधीत धावणार आहे. ही गाडी बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उधना स्थानकावरून सकाळी ०८:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१:०० वाजता मधुबनी येथे पोहोचेल.
मधुबनी–उधना विशेष गाडी
परतीच्या दिशेने मधुबनी–उधना ०९१५२ ही विशेष गाडी २ मेपासून २७ जूनपर्यंतच्या या कालावधीत दर गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. ही गाडी मधुबनी येथून रात्री ११:०० वाजता सुटून शनिवारी आणि सोमवारी दुपारी ०२:०० वाजता उधना येथे पोहोचेल.
महत्वाच्या स्थानकांवर थांबे ?
नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, मिर्झापूर, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटणा, फातुहा, बख्तीयार, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा आणि साकरी आदी स्थानकांचा समावेश विशेष गाडीच्या मार्गात करण्यात आला आहे.
ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित (General) स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रवाशांना आधीच तिकीट बुक करण्याची किंवा आरक्षणाची गरज भासणार नाही. सुट्टीसाठी गावी जाणारे मजूर, विद्यार्थी आणि तातडीने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही ‘स्पेशल ट्रेन’ वरदान ठरणार आहे.







