डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

एप्रिल 23, 2026 6:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गायन स्पर्धेत सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत विभागीय व राज्य स्तरावर मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.

ggd

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे भावेश जाधव, ऋषभ भुते आणि स्वरूप काळेकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे आयोजित नाशिक विभागीय स्तरावर झालेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून राज्यस्तरीय स्पंदन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून संस्थेचा गौरव वाढवला आहे.

गायन, तबला आणि हार्मोनियम या तिन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट सादरीकरण करत या विद्यार्थ्यांनी सर्वांगीण कौशल्याचे दर्शन घडवले. या यशात भावेश जाधव (गायक), ऋषभ भुते (तबला) आणि स्वरूप काळेकर (हार्मोनियम) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्यांचे सर्वत्र कौतु

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now