खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा! आजपासून वाटवा-हावडा विशेष ट्रेन धावणार, असे आहेत वेळापत्रक?

एप्रिल 20, 2026 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्या आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळ मार्गे वाटवा ते हावडा दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहेत

train

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ०९४७९ ‘वाटवा–हावडा स्पेशल’ ही विशेष गाडी २० ते २६ एप्रिल या कालावधीत नियमितपणे धावणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन वेळा सोमवारी आणि रविवारी दुपारी ०४:४५ वाजता वाटवा स्थानकावरून सुटेल. आणि दीड दिवसांचा प्रवास करत बुधवारी आणि मंगळवारी सकाळी ०९:०० वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी ०९४८० ‘हावडा–वाटवा स्पेशल’ ही गाडी २२ ते २८ एप्रिल या कालावधीत धावणार असून, ती मंगळवारी आणि बुधवारी सायंकाळी ०७:०० वाजता हावडा स्थानकाहून सुटेल. आणि गुरुवारी आणि शुक्रवारी १२:१५ वाजता वाटवा येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?
दोन्ही गाड्यांना मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये वडोदरा, भरुच, अंकलेश्वर, उधना, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिनदयाल उपाध्याय, सासाराम, गया, कोडेर्मा, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील प्रवाशांना थेट आणि सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now