जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) विविध पदांच्या तब्बल ३००३ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. Staff Selection Commission

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ मे २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा. SSC Recruitment 2026

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) स्टेनोग्राफर
2) लॅबोरेटरी अटेंडंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) सायंटिफिक असिस्टंट
5) ड्रिलिंग असिस्टंट
6) स्टोअर क्लर्क
7) अकाउंटंट
8) स्टोअर अटेंडंट
9) रिसर्च असिस्टंट
10) सिनिअर सायंटिफिक असिस्टंट
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट : उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे, तर कमाल वय साधारणपणे पदानुसार २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असते. शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC, इत्यादी) उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क ₹१०० आहे. महिला उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक (ESM) यांना शुल्क भरण्यापासून सूट आहे. शुल्क ऑनलाइन भरता येईल.
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल. यामध्ये वेतन स्तर १ ते ७ मधील पदांचा समावेश असून, मूळ पगार अंदाजे ₹५,२०० ते ₹३४,८०० पर्यंत असेल. कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA), महागाई भत्ता (DA) आणि प्रवास भत्ता (TA) यांसारखे अतिरिक्त भत्ते देखील मिळतील.
कसा कराल अर्ज?
१. एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट द्या.
२. ‘सिलेक्शन पोस्ट फेज-१४ रिक्रूटमेंट २०२६’ ची लिंक शोधा.
३. ऑनलाइन नोंदणी करा.
४. सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
६. अर्ज शुल्क (लागू असल्यास) ऑनलाइन भरा.
७. अर्ज सादर केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या.












