मीनल करणवाल यांची बदली ; करिश्मा नायर जळगाव जिल्हा परिषदेच्या नव्या CEO

एप्रिल 8, 2026 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२६ । महाराष्ट्रातील प्रशासनात बदल्याच्यांचे वारे वाहत असल्याचे चित्र असून आज आणखी ११ सनदी अधिकार्‍यांची बदली झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती आता मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या’ (POCRA) प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे.

DUPH

तर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे.

नायर यांनी नाशिकमध्ये आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने ठसा उमटवला असून, आता जळगाव जिल्ह्याचा ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या बदल्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनात आता नव्या दमाने कामाला सुरुवात होणार आहे. लवकरच या दोन्ही महिला अधिकारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now