ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! युद्धामुळे सोने-चांदीचा भाव तब्बल ‘इतक्या’ हजारांची घसरण?..

एप्रिल 3, 2026 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२६ । एकीकडे आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे सोने-चांदीचे दर घसरले आहेत.जळगावच्या सुवर्णबाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

gold silver jpg webp

सोन्याचे दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा २५७५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले.

चांदीचे दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात ६१८० रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत घसरले.

आखाती देशांमधील या युद्धांमुळे सोन्याचे दर आतापर्यंत १२४८९ रुपयांची घसरण झाली आहे. तर युद्धाच्या कालावधी चांदीचे दर ४०,००० रुपयांनी घसरले आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर तणाव असला तरीही सोने-चांदीची मागणी वाढताना दिसत आहे. ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने अनेक लोक सोने-चांदी खऱेदी करताना दिसत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now