जळगावातील तरुणांना नामांकित कंपन्यांत इंटर्नशिपच्या संधी, इतके विद्यावेतन मिळणार?

एप्रिल 2, 2026 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराभिमुख मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीत जिल्ह्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये १२ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

job jpg webp

या योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन तसेच रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या भारत पेट्रोलियम, डाबर इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध असून दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव (दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९०) येथे संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now