जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या उंबरठ्यावरच रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अडचण उभी ठाकली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया स्थानकावर सुरू होणाऱ्या ट्रॅक दुरुस्तीच्या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या एप्रिल महिन्यात तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांच्या प्रवासाचे गणितच बिघडणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १८०३० शालिमार–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) एक्सप्रेस ४ ते २४ एप्रिल, १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस–शालिमार एक्सप्रेस ६ ते २६ एप्रिल, तसेच १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस–शालिमार एक्सप्रेस ४ ते २१ एप्रिल आणि १२१०२ शालिमार–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ६ ते २३ एप्रिल या कालावधीत धावणार नाहीत.

ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी आणि देखभाल काम सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान,मध्य रेल्वेकडून सर्व प्रवाशांना सूचित करण्यात आले आहे की रद्द किंवा आंशिक गाड्यांमुळे प्रवाशांनी तिकीट बदल, रद्द किंवा पर्यायी मार्गांची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. स्थानकावर माहिती काउंटर व ऑनलाइन पोर्टलवर अपडेटेड वेळापत्रक उपलब्ध आहे. कामाच्या कालावधीत संयम राखून प्रवास करावा, तसेच संभाव्य विलंबाचा अंदाज घेऊन योजना आखावी.







