बीएचआर प्रकरण : सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी

जून 22, 2021 6:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । बीएचआर घोटाळाप्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या प्रेम कोगटा, भागवत भंगाळेसह ११ जणांना आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

bhr scam (1)

राज्यभर गाजलेल्या बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ जून रोजी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून १२ जणांना अटक केली होती. या सर्वांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. या सर्व संशयित आरोपींनी ३० टक्क्याप्रमाणे पावत्या विकत घेतल्याने बीएचआर पतसंस्थेत विशिष्ट प्रकारे संगनमत करून घोटाळा करण्यात आला आहे. यामुळे ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे सर्व संशयितांना पोलीस कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी होती. दरम्यान, आज सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांना केली होती अटक
अटक केलेल्यांमध्ये भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम रामनारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now