नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई ! दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्ट्यासह अटक

मार्च 24, 2026 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२६ । दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका तरुणाला नशिराबाद पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. चेतन सूर्यभान पाटील ( वय 18, रा. वरची अळी, नशिराबाद) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्याकडून गावठी कट्टासह डमी गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nashibrad

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रात्री सुमारे ८.२० वाजता आरोपी चेतन पाटीलला पकडले. तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा तसेच एक डमी गावठी कट्टा जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now