जळगावातच तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

मार्च 23, 2026 4:32 PM

३, ४ व ५ एप्रिलला जळगावात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, फक्त १०० रुग्णांसाठी संधी

eees

जळगाव लाईव्ह न्यूज । तिरळेपणा या डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे दि. ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी तिरळेपणा व पडलेली पापणी यासाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी पुण्याचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.मधुसूदन झंवर उपस्थित राहणार आहेत. त्यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी त्यांनी १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now