जळगावातील प्रवाशांना दिलासा ! मुंबई, पुण्याहून नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मार्च 22, 2026 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावहुन नागपूर, मुंबईकडे मार्गावर प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर तसेच पुणे ते नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली. विशेष या गड्यानं जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे जळगावकर प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

train

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे नागपूरकडे जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. एलटीटी-नागपूर विशेष गाडी (क्र. ०१०२१) ही ३ एप्रिल रोजी एलटीटी येथून रात्री १२.५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीसाठी नागपूर-एलटीटी विशेष गाडी (क्र. ०१०२२) ही ३ एप्रिल रोजी नागपूर येथून रात्री ८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटी येथे पोहोचणार आहे.

या स्थानकांवर असेल थांबा ?
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. गाडीची संरचना १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ गार्ड ब्रेक व्हॅन अशी ठेवण्यात आली आहे.

याशिवाय पुणे-नागपूर दरम्यानही दोन विशेष सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे-नागपूर विशेष गाडी (क्र. ०१४६७) ही ३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. तर नागपूर-पुणे विशेष गाडी (क्र. ०१४६८) ही ४ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूर येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.

या स्थानकांवर असेल थांबा ?
या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य श्रेणी अशी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now