⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावल शहरातील बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर रोडवरील अतिक्रमण धारकांना नोटीसा

यावल शहरातील बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर रोडवरील अतिक्रमण धारकांना नोटीसा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जून २०२१ । यावल येथील शहरातुन जाणाऱ्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर या मार्गावरील शहरालगतच्या रस्त्यावर शासकीय जागेवर व्यवसायीकांनी बेकायद्याशीर अतिक्रमण करून ठेवले आहे. या अनधिकृत व्यवसायीकांच्या अतिक्रमाणामुळे या रस्त्यावर अनेक वेळा गंभीर स्वरुपाचे अपघात देखील झालेले असून  या रस्त्यावरील व्यवसायीकांनी बेकाद्याशीरपणे केलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, या संदर्भात महसुल प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.

या संदर्भात फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी दि.१६ जून रोजी यावल शहरालगतच्या असलेल्या बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्य मार्गा क्रमांक४ किमि १८१ / ३३५ते १८२ / ३३५मध्ये रस्त्याच्या माध्यमापासून १५ मिटर अंतरावर अनधिकृतपणे सरकारी मालकीच्या जागेवर बेकाद्याशीर ताबा घेवुन मार्गाच्या दोघ डाव्या / उजव्या बाजुस कच्चे अथवा पक्के बांधकाम तयार केलेले असल्याचे या नोटीसी व्दारे सुचविण्यात आले आहे.

दरम्यान सदरची नोटीस मिळाल्याच्या आठ दिवसाच्या आत आपआपल्या स्वखर्चाने केलेले अतिक्रमण काढुन घेवुन सरकारी जागा पुर्वरत करावी. प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी नोटीसी व्दारे विनिदेशित केलेल्या मुदतीत तुमचे काही म्हणणे असल्यास, अथवा जागेच्या वापराबाबत काही कागदोपत्री पुरावा असल्या , संबंधीत कार्यालयास सत्वर सादर करावा. अन्यथा आपले विरूद्ध महाराष्ट्र जमीन महसुल जमीन अधिनियम , १९६६च्या कलम५० (३ ) व मुंबई हायवे अॅक्ट१९५५ कलम५०व२५ अन्वये खात्यामार्फत कार्यवाही करून जागा ताब्यात घेवुन त्या खर्चाची नुकसान भरपाईसकट रक्कम आपल्याकडुन वसुलीची आवश्यक कार्यवाही केली जाईल.

तसेच महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियमाच्या कलम५४ अन्वये अतिक्रमीत मालमत्ता शासन जप्त करण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे. दरम्यान या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हे पुर्वी यावल तहसीलला तहसीदार म्हणुन व या वेळेस विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या कार्यकाळात सहा वर्षा पुर्वी २०११ते २०१४ वर्षीच्या या कार्यकाळात मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. यामुळे सदरच्या अतिक्रमणा विषयी प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचा दांडगा अनुभव व निर्णय घेण्याची क्षमता यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार असल्याचे मत शासनप्रिय जाणकार व्यक्त करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.