जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लॅम्प लाईटींग व प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमामध्ये बी.एस्सी., जी.एन.एम. व ए.एन.एम. विद्यार्थ्यांनी नर्सिंग व्यवसायातील सेवाभाव, समर्पण व मानवतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पुष्पेंद्र निकुम (प्राचार्य, शासकीय नर्सिंग महाविद्यालय, जीएमसी जळगाव) उपस्थित होते. कार्यक्रमास मा. डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन) यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट), डॉ. प्रशांत सोलंकी, अधिष्ठाता, डॉ एन. एस. आर्वीकर यांचीही उपस्थिती लाभली.


या प्रसंगी प्रा. विशाखा गानवीर (प्राचार्य, गोदावरी नर्सिंग जळगाव),प्रा. शिवानंद बिरादार (प्राचार्य, डॉ केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव) प्रा. प्रणिता गायकवाड (उपप्राचार्य, डॉ केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव ), व प्रा. जॅसिंथ धावा (उपप्राचार्य, गोदावरी नर्सिंग जळगाव), प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन स्वराज बॅच यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. मीनाव देवी, प्रियंका जगताप, कॅलॉट लोंढे, सचिन पवार, साक्षी गायकवाड व मानसी ढोबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास व्यवस्थापन, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










