गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

मार्च 7, 2026 4:08 PM

लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; विद्यार्थ्यांचे पोवाडे, पथनाट्य व वक्तृत्वातून शिवचरित्राचे स्मरण

gpd

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

६ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून लेझीम पथकाच्या तालावर विविध सादरीकरणे केली. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी जल्लोषपूर्ण मिरवणूक काढली.

मिरवणुकीदरम्यान प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून गड-किल्ल्यांचे संवर्धन व महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे आवाहन करण्यात आले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवपाळणा व जन्मोत्सव सोहळा पार पडला. कार्यक्रमात निधी बैसाणे, ऋतुजा ठेंग, उत्कर्षा राजपूत, प्रणाली मुसळे, चेतना सोनवणे, दिव्या भांडारकर, राजश्री यादव, चेतस पाटील व भावेश रावळकर या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडे, नृत्य आणि प्रभावी वक्तृत्व सादर केले.

प्रा. डॉ. हेमंत इंगळे यांनी शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हे त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकीचे उदाहरण आहेत. त्यांच्या स्थापत्यकलेत रणनीती, संरक्षण आणि तांत्रिक कौशल्य यांचा अद्भुत संगम दिसून येतो.तर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी शिवचरित्र सांगताना युवकांनी शिवरायांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीचेही उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले.कार्यक्रमात उत्कृष्ट भाषण करणार्‍या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये प्रथम क्रमांक चेतना सोनवणे तर द्वितीय क्रमांक दिव्या भांडारकर यांनी पटकावला.शिवजयंती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नकुल गाडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहित चौधरी, गौरव इंगळे आणि साक्षी घोडके यांनी केले.या कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now