उधना ते सुभेदारगंज दरम्यान विशेष ट्रेन धावणार; जळगाव जिल्ह्यातील या स्थानकांवर असेल थांबा?

मार्च 6, 2026 6:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना ते सुभेदारगंज दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून या गाडीला जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव आणि भुसावळला थांबा देण्यात आला आहे.

train

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०४१५६ उधना–सुभेदारगंज विशेष ही गाडी १० मार्च ते ३१ मार्च या कालावधीत उधना स्थानकावरून प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता सुभेदारगंज येथे पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी ०४१५५ सुभेदारगंज–उधना विशेष ही गाडी ९ मार्च ते ३० मार्च या कालावधीत सुभेदारगंज स्थानकावरून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.४० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता उधना येथे पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमुळे गुजरात ते उत्तर प्रदेश या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

या स्थानकांवर असेल थांबा?

दोन्ही विशेष रेल्वे गाड्यांना मार्गातील व्यारा, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, वीरांगना लक्ष्मीबाई झांशी, ओराई, पोखरण, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या विशेष गाडीत एसी ३ टियर, स्लीपर क्लास तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना त्यांच्या सोयीप्रमाणे प्रवास करता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now