कर्जबाजारी झालेल्या जामनेरातील वेंडरने उचललं धक्कादायक पाऊल

फेब्रुवारी 28, 2026 2:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सावकारी कर्ज व त्याच सावकारासोबत केलेल्या जमीन व्यवहारातून कर्जबाजारी झालेल्या जामनेरातील वेंडरने जीवनयात्रा संपविली.

kailas sonavane

कैलास रघुनाथ सोनवणे (वय ५१) असे मृताचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, यावेळी मृताच्या खिशात सापडलेली सुसाइड नोट पाहता नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी व पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सोनवणे यांनी जामनेरातील एका सावकाराकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. व्याजासह सावकाराने १४ लाख रुपये काढले. मात्र कोळी यांनी दहा लाख रुपयात तडजोड करून ते परत केले. त्यानंतर सावकाराने डाव ठेवून त्याच्या माध्यमातून शेरी येथील जमिनीचा व्यवहार केला. प्लॉट विकल्यानंतर हिशोब करू व आपापले पैसे वाटून घेऊ असे सांगितले.

कोळी यांनी ओळखीसह नातेवाइकांकडून पैसे व्याजाने घेऊन शेतकऱ्यांचे पैसे दिले. मात्र सावकाराने शेती कोळी याच्या नावे न करता तिसऱ्याच्याच नावे केली. मात्र त्यानंतर हिशोबासाठी उडवा-उडवीची उत्तरे देत सोनवणे यांची आर्थिक कोंडी केली. या त्रासाला कंटाळून कोळी यांनी शुक्रवारी गळ#$ फास घेऊन आत्म#$ हत्या केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now