प्रवास अधिक सोयीस्कर होणार ! जळगावला मिळणार दीडशेवर नवीन बस?

फेब्रुवारी 23, 2026 2:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्यासाठी १७८ नवीन बसची मागणी केली आहे. जळगावला किमान १५०-१८० नवीन बस मिळण्याची शक्यता असून ज्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

bus

नावकरण केलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये सध्याच्या ४० जागांच्या (२ बाय २) बसऐवजी ५५ जागा (३ बाय २) असतील. यामुळे अधिक प्रवाशांना बसून प्रवास करता येईल, खासकरून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

पूर्वी ५५ जागांच्या बस लक्झरी प्रमाणे २ बाय २ बसच्या स्वरूपात होत्या, ज्यामुळे आसनांची संख्या कमी झाली होती. परंतु आता ३ बाय २ बसमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांना उभे राहावे लागण्याची अडचण कमी होईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

एसटी बसवरील विविध सवलतींमुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन बस आणल्याने गर्दीच्या वेळा कमी होतील आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.एकूणच, जळगावकरांसाठी ही नवी व्यवस्था प्रवासाचा अनुभव सुधारेल आणि एसटी प्रशासनाच्या सेवेत अधिक कार्यक्षमतेची हमी देईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now