जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची कर्जमाफी धोक्यात! हे काम त्वरित करा, अन्यथा..?

फेब्रुवारी 21, 2026 1:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शेतकरी कर्ज निवृत्ती योजना २०२३ अंतर्गत जिल्ह्यात तब्बल २६,०३१ शेतकऱ्यांची कर्जमाफी तांत्रिक कारणांमुळे आता टांगणीला लागली आहे.

farmer

या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील सादर न केल्याने जिल्हा बँकेच्या पोर्टलवर त्यांची नोंदणी रखडली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वारंवार आवाहन करूनही हजारो शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७, १४ आणि १७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर निवेदनांनंतरही प्रतिसाद न मिळाल्याने आता बँकेने कठोर भूमिका घेतली असून तातडीने कागदपत्रे न दिल्यास शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ कायमचे रद्द होऊ शकतो. विशेषत: जामनेर आणि चाळीसगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हे काम त्वरित करा?

जिल्हा उपनिबंधक, बँकेचे संचालक आणि कार्यकारी संचालकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, आधार कार्डची प्रत आणि बँक खाते क्रमांकाचा पुरावा (पासबुक/चेक) आपल्या गावच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेत (सोसायटी) किंवा जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत सादर करावेत. वेळेत कागदपत्रे न दिल्यास कर्जमाफी मिळणार नाही आणि त्यास शेतकरी स्वतः जबाबदार राहतील. यामध्ये बँक किंवा सोसायटीची कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहणार नाही, असे बँकेने म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now