धरणगावात भंगार गोडाऊनला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

फेब्रुवारी 17, 2026 1:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२६ । धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले.

dharangaonfire

आकाशात धुराचे प्रचंड लोट आणि आगीचे लोळ उसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, गोडाऊनच्या शेजारीच महावितरणचे 132 केव्हीचे सब स्टेशन असल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र सुदैवाने आग त्या दिशेने पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच धरणगावसह अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जळून नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now