जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । मोहाडी गावापासून जवळच असलेला कांताई बंधारा सध्या तुडुंब भरला आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणारा तरुण आकाश पाटील हा मित्रांसोबत त्या ठिकाणी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो पाण्यात बुडाला.
तीन तासापासून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. कांताई बंधाऱ्यावर असलेले कठडे काढल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सतिष हाळनोर, हरी पाटील, सुशील पाटील, प्रवीण हिवराळे आदी घटनास्थळी पोहचले असून नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.
धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कांताई बंधारा परिसरात धोक्याची सूचना देणारा फलक लावण्यात आलेला आहे. जळगाव शहर आणि परिसरातील नागरिक त्याठिकाणी फिरण्यासाठी जात असतात यावेळी सुचनेकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येते.
पहा व्हिडीओ :