जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज गुरुवारी सकाळी ७.३० वाजेपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान सुरुवातीच्या दोन तासात जळगावमध्ये 5.5% टक्के मतदान झाले आहे.

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून झाले असून उर्वरित ६३ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत 5.5% टक्के मतदान आले. यामध्ये एकूण 24148 मतदारांनी मतदान केलं असून त्यामध्ये 14,494 पुरुष तर 9,654 महिलांचा समावेश आहे.












