थंडी झाली गायब ! जळगावच्या किमान-कमाल तापमानाचा पारा वाढला

जानेवारी 15, 2026 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत असून, ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. एकाच दिवसात जळगावच्या किमान तापमानात ४ अंशापर्यंतची वाढ झाली. यामुळे थंडी गायब झाली आहे. मंगळवारी १०.९ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी वाढून १४.५ अंशावर जाऊन पोहोचला आहे. कमाल तापमानाचा पारा देखील ३० अंशावर गेला आहे.

tapman 2

यंदा संपूर्ण डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र, वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानाचा पॅटर्न बदलला असल्याचं पाहायला मिळत असून मागच्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. यामुळे थंडी अचानक गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागचे चार दिवस जळगावचे रात्रीचे किमान तापमान ११ अंशाखाली स्थिर होते. मात्र बुधवारी एकाच दिवसात रात्रीच्या तापमानात ४ अंशापर्यंत वाढ होऊन पारा १४.५ अंशावर जाऊन पोहोचला आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. तर दिवसाच्या कमाल तापमानातही वाढ झाली आहे दिवसाचा पारा ३०.४ अंशावर जाऊन पोहोचला आहे. यामुळे दिवसाच्या काहीसा उकाडा जाणवू लागला आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now