Jalgaon : प्रभाग ७ मध्ये भव्य रॅलीने परिसर झाला भाजपमय

जानेवारी 13, 2026 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक ७ ‘ड’ चे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. या रॅलीत प्रभाग ७ मधील इतर भाजप उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील आणि विशाल सुरेश भोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने मतदारांना साद घातली, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

prabhag7

यावेळी बोलताना आ.भोळे यांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी चंद्रशेखर अत्तरदे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रचार रॅली शिव कॉलनी, आशा बाबा नगर, शामराव नगर, पंडितराव कॉलनी आदी मार्गावरून गेली. त्या ठिकाणी नागरिकांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मतदारांचा हा उत्साह पाहता, प्रभाग ७ मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now