प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कालावधीत झेलम, गोवा एक्स्प्रेस कल्याणमार्गे धावणार..

जानेवारी 11, 2026 2:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेच्या पुणे विभागामधील दौंड व काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकारणाच्या कामासाठी २३ ते २५ जानेवारीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ज्यामूळे १६ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आले आहे. तर ५ गाड्यांचे मार्ग बदल, ४ गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सुटणार आहे.

train

यातील अनेक गाड्या जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या असून प्रवाशांनी गाड्यांची स्थिती पाहून घरातून रेल्वे स्टेशनवर जावं. एकीकडे जळगावहुन पुण्याकडे जाण्यासाठी मोजक्याच रेल्वे गाड्या धावतात. त्यातही आता ब्लॉकमुळे जळगावमार्गे पुण्याला जाणाऱ्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या पुणे–जम्मुतवी झेलम, हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा गोवा, पुणे–गोरखपूर एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

रद्द गाड्या आणि कालावधी :
११०२५ पुणे–अमरावती एक्स्प्रेस (२४, २५ जानेवारी)
११०२६ अमरावती–पुणे एक्स्प्रेस (२३, २४ जानेवारी)
१२१२० अमरावती–पुणे एक्स्प्रेस (२५ जानेवारी)
११४०९ दौंड–निजामाबाद एक्स्प्रेस (२४ जानेवारी)
११४१० निजामाबाद–पुणे एक्स्प्रेस (२३ जानेवारी)
१२११३ पुणे–नागपूर गरीब रथ एक्स्प्रेस (२४ जानेवारी)
१२११४ नागपूर–पुणे गरीब रथ एक्स्प्रेस (२३ जानेवारी)
१७६२९ पुणे–नांदेड एक्स्प्रेस (२४ आणि २५ जानेवारी)
१७६३० नांदेड–पुणे एक्स्प्रेस (२३ आणि २४ जानेवारी)
२२१३९ पुणे–अजनी हमसफर एक्स्प्रेस (२४ जानेवारी)
२२१४० अजनी–पुणे हमसफर एक्स्प्रेस (२५ जानेवारी)
१२१३६ नागपूर–पुणे एक्सप्रेस (२४ जानेवारी)
१२१३५ पुणे–नागपूर एक्स्प्रेस (२५ जानेवारी)
१७६१३ पनवेल–नांदेड एक्स्प्रेस (२४, २५ जानेवारी)
१७६१४ नांदेड–पनवेल एक्स्प्रेस (२३,२४ जानेवारी)
११०४१ दादर–साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (२४ जानेवारी)
११०४२ साईनगर शिर्डी–दादर एक्स्प्रेस (२५ जानेवारी)

गाड्यांचे मार्ग परिवर्तन :
२२६८५ यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस २४ जानेवारीला मनमाड, इगतपुरी, कसारा, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे चंदीगडला जाईल.
२०६५७ हुबळी–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस २४ जानेवारीवा नियोजित मार्गाऐवजी सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे हजरत निजामुद्दीन जाईल.
११०७८ जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस २३ जानेवारीला आपल्या नियोजित मार्गाऐवजी मनमाड, इगतपुरी, कसारा, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे जाईल.
१२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा एक्स्प्रेस २३ आणि २४ जानेवारीला आपल्या नियोजित मार्गाऐवजी मनमाड, इगतपुरी, कसारा, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे वास्को-द-गामा जाईल.
१५०३० पुणे–गोरखपूर एक्स्प्रेस २४ जानेवारीला आपल्या नियोजित मार्गाऐवजी लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे गोरखपूर जाईल.

गाड्यांचे पुनर्निर्धारण :
११०२५ पुणे–अमरावती एक्स्प्रेस १५, १६, १८-२३ जानेवारीला पुणे येथून ०१ तास ३० मिनिटांनी उशिराने सुटेल.
१२१०३ पुणे–लखनऊ एक्स्प्रेस ११ आणि १३ जानेवारीला ०१ तास ५० मिनिटांनी आणि २० जानेवारीला ०१ तास ३० मिनिटांनी उशिराने सुटेल.
२२८४५ पुणे–हाटिया एक्स्प्रेस १२ जानेवारीला ०२ तास १० मिनिटांनी आणि १८, २१ जानेवारीला ०२ तासांनी उशिराने सुटेल.
०२१३१ पुणे–जबलपूर एक्स्प्रेस १९ जानेवारीला ०१ तास ३० मिनिटांनी उशिराने सुटेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now