गावकऱ्यांनी मानले ना. गुलाबराव पाटलांसह प्रतापराव पाटलांचं आभार

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२६ । राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने सावखेडा खुर्द फाट्यापासून ते गावापर्यंत मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपुजन पंचदशनाम जुना आखाडा थानापती महंत रजनीशजी पुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी तालुका समन्वय जितू पाटील, सुरेश पाटील, मगन पाटील, प्रल्हाद पाटील, जन्मादास पाटील, रविंद सपकाळे उपस्थित होते. तसेच युवा वर्ग देखील उपस्थित उपस्थित होता.
या प्रसंगी गावाकऱ्यांनी ना. गुलाबरावजी पाटील, युवानेते प्रतापराव पाटील (मा.जि. सदस्य) यांचे आभार व्यक्त केले. सावखेडा गावावरती नामदार महोदयांचं विशेष प्रेम असल्याचे देखील ग्रामस्थांनी म्हटले. रस्त्याचं काम बघून चांगला दर्जाचं काम होतं असल्याचं अनेक गावकऱ्यांनी ग्वाही दिली












